Posts

युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृती जपावी - खासदार अशोक नेते.. P10NEWS

Image
   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)) युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृती जपावी - खासदार अशोक नेते. नेहरू युवा केंद्र, गडचिरोली द्वारा आयोजित युवा उत्सव २०२३ गडचिरोली / दि.०८ : नेहरू युवा केंद्र, गडचिरोली युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित युवा उत्सव २०२३ कृषी महाविद्यालय गडचिरोली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते पार पडला. या समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना, युवकांनी अशा कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव देत आपल्या संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमातून युवकांनी व्यक्तिमत्व विकास करावा असेही आवाहन त्यांनी केले. विजय, पराजय, होणे सहाजिकच आहे,जे स्पर्धक विजय झाले त्यांचा अभिनंदन व जे स्पर्धकांना अपयश आले त्यांनी खचून न जाता पुढे प्रयत्न करावे. चांगला कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित केल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे अभिनंदन केले. सामूहिक नृत्य, भाषण, चित्रकला, कविता, फोटोग्राफी अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक